नीतिसूत्रे 5 : 1 (IRVMR)
{बदफैली स्त्रीविषयी ताकीद} [PS] माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव; [QBR] माझ्या सुज्ञानाकडे काळजीपूर्वक आपला कान लाव. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 2 (IRVMR)
म्हणून तू दूरदर्शीपणाविषयी शिक्षण घे, [QBR] आणि तुझे ओठ तुझ्या विद्येचे रक्षण करतील. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 3 (IRVMR)
कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो, [QBR] आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते, [QBR]
नीतिसूत्रे 5 : 4 (IRVMR)
पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, [QBR] आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 5 (IRVMR)
तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; [QBR] तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 6 (IRVMR)
म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. [QBR] तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 7 (IRVMR)
आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; [QBR] माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 8 (IRVMR)
तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 9 (IRVMR)
गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल, [QBR] आणि तुझ्या आयुष्याची वर्षे क्रूरजनाच्या हाती जातील; [QBR]
नीतिसूत्रे 5 : 10 (IRVMR)
तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील, [QBR] आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 11 (IRVMR)
जेव्हा तुझा देह व शरीर सर्वकाही नष्ट होईल, [QBR] तेव्हा तुझ्या आयुष्याच्या शेवटी तू शोक करशील. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 12 (IRVMR)
तू म्हणशील “मी शिस्तीचा कसा द्वेष केला, [QBR] आणि माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले! [QBR]
नीतिसूत्रे 5 : 13 (IRVMR)
मी माझ्या शिक्षकांच्या आज्ञा पाळल्या नाहीत, [QBR] किंवा मला शिकवणाऱ्याकडे कान दिला नाही. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 14 (IRVMR)
मंडळी व सभा यांच्यादेखत [QBR] मी बहुतेक पुर्णपणे नाश पावलो होतो.” [QBR]
नीतिसूत्रे 5 : 15 (IRVMR)
तू आपल्याच टाकितले पाणी पी, [QBR] तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 16 (IRVMR)
तुझे झरे बाहेर सर्वत्र वाहून जावे काय, [QBR] आणि तुझ्या पाण्याचा प्रवाह सार्वजनिक चौकात वाहावा कां? [QBR]
नीतिसूत्रे 5 : 17 (IRVMR)
ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, [QBR] आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 18 (IRVMR)
तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, [QBR] आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह [* तू तरुण असताना केलेल्या पत्नीसह] तू संतुष्ट रहा. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 19 (IRVMR)
कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. [QBR] तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; [QBR] तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 20 (IRVMR)
माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; [QBR] तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे? [QBR]
नीतिसूत्रे 5 : 21 (IRVMR)
मनुष्य काय करतो हे परमेश्वर सर्वकाही पाहतो, [QBR] तो त्याच्या सर्व वाटांकडे लक्ष देतो. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 22 (IRVMR)
दुष्ट मनुष्यास त्याची स्वतःचीच दुष्कर्मे धरतात, [QBR] त्याची पापे दोरीप्रमाणे त्यास घट्ट पकडतील. [QBR]
नीतिसूत्रे 5 : 23 (IRVMR)
शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: