नीतिसूत्रे 6 : 1 (IRVMR)
आळस व खोटेपणा ह्यांविषयी उपदेश माझ्या मुला, शेजाऱ्याच्या कर्जाला जामीनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास, ज्याला तू ओळखत नाही अशा कोणाला तू कर्जासाठी वचन दिले,
नीतिसूत्रे 6 : 2 (IRVMR)
तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस, आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस.
नीतिसूत्रे 6 : 3 (IRVMR)
ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपला बचाव कर, कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस. जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास आग्रह कर.
नीतिसूत्रे 6 : 4 (IRVMR)
तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस, आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको.
नीतिसूत्रे 6 : 5 (IRVMR)
शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला; जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव.
नीतिसूत्रे 6 : 6 (IRVMR)
अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो.
नीतिसूत्रे 6 : 7 (IRVMR)
तिला कोणी सेनापती अधिकारी, किंवा राजा नाही.
नीतिसूत्रे 6 : 8 (IRVMR)
तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते.
नीतिसूत्रे 6 : 9 (IRVMR)
अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील?
नीतिसूत्रे 6 : 10 (IRVMR)
“आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.”
नीतिसूत्रे 6 : 11 (IRVMR)
असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.
नीतिसूत्रे 6 : 12 (IRVMR)
दुर्जन व वाईट मनुष्य त्याच्या कपटी बोलण्याने जगतो,
नीतिसूत्रे 6 : 13 (IRVMR)
त्याचे डोळे मिचकावतो, आपल्या पायांनी इशारा करतो, आणि आपल्या बोटांनी खुणा करतो.
नीतिसूत्रे 6 : 14 (IRVMR)
त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो; तो नेहमी वैमनस्य पसरतो.
नीतिसूत्रे 6 : 15 (IRVMR)
यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्यास गाठेल; कोणत्याही उपचाराशिवाय एका क्षणात तो तुटेल.
नीतिसूत्रे 6 : 16 (IRVMR)
परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो, त्यास अशा सात गोष्टींचा वीट आहेः
नीतिसूत्रे 6 : 17 (IRVMR)
गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ, निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात,
नीतिसूत्रे 6 : 18 (IRVMR)
मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात,
नीतिसूत्रे 6 : 19 (IRVMR)
लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत.
नीतिसूत्रे 6 : 20 (IRVMR)
व्याभिचाराविषयी ताकीद माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ, आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
नीतिसूत्रे 6 : 21 (IRVMR)
ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर; ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.
नीतिसूत्रे 6 : 22 (IRVMR)
जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.
नीतिसूत्रे 6 : 23 (IRVMR)
कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे; शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे.
नीतिसूत्रे 6 : 24 (IRVMR)
ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते, व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते.
नीतिसूत्रे 6 : 25 (IRVMR)
तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो.
नीतिसूत्रे 6 : 26 (IRVMR)
वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल.
नीतिसूत्रे 6 : 27 (IRVMR)
मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर, त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय?
नीतिसूत्रे 6 : 28 (IRVMR)
जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला, तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय?
नीतिसूत्रे 6 : 29 (IRVMR)
जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे; जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.
नीतिसूत्रे 6 : 30 (IRVMR)
जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही; तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली.
नीतिसूत्रे 6 : 31 (IRVMR)
पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल, तो आपल्या घरचे सर्वच द्रव्य देईल.
नीतिसूत्रे 6 : 32 (IRVMR)
जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे; जो आपल्या जिवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो.
नीतिसूत्रे 6 : 33 (IRVMR)
जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही.
नीतिसूत्रे 6 : 34 (IRVMR)
कारण ईर्ष्या मनुष्यास संतप्त करते; सूड उगविण्याच्या दिवशी तो गय करणार नाही.
नीतिसूत्रे 6 : 35 (IRVMR)
तो काही खंडणी स्वीकारणार नाही, आणि त्यास खूप दाने दिली तरी तो शांत राहणार नाही.
❮
❯