नीतिसूत्रे 7 : 1 (IRVMR)
{व्याभिचारिणीच्या कारवाया} [PS] माझ्या मुला, माझे शब्द जपून ठेव, [QBR] आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 2 (IRVMR)
माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत रहा, [QBR] आणि माझे शिक्षण डोळ्यातील बाहुलीप्रमाणे जप. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 3 (IRVMR)
ती आपल्या बोटांस बांध; [QBR] ती आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 4 (IRVMR)
“तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण, [QBR] आणि सुज्ञतेला आपले नातेवाईक म्हण, [QBR]
नीतिसूत्रे 7 : 5 (IRVMR)
अशासाठी की, भुरळ घालणाऱ्या स्त्रीपासून, [QBR] ते तुला व्यभिचारी स्त्रीच्या गोड शब्दांपासून वाचवतील. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 6 (IRVMR)
माझ्या घराच्या खिडकीजवळील [QBR] जाळ्यातून मी बाहेर पाहिले; [QBR]
नीतिसूत्रे 7 : 7 (IRVMR)
आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. [QBR] मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, [QBR] जो बुद्धिहीन मनुष्य होता. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 8 (IRVMR)
तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, [QBR] आणि तो तिच्या घराकडे, [QBR]
नीतिसूत्रे 7 : 9 (IRVMR)
त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात, [QBR] रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 10 (IRVMR)
आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, [QBR] वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 11 (IRVMR)
ती वाचाळ व स्वच्छंदी असून, [QBR] तिचे पाय घरी राहत नाही; [QBR]
नीतिसूत्रे 7 : 12 (IRVMR)
कधी रस्त्यात, कधी बाजारात, [QBR] प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 13 (IRVMR)
मग तिने त्यास धरले आणि त्याची चुंबने घेतली; [QBR] निर्लज्जपणे ती त्यास म्हणाली, [QBR]
नीतिसूत्रे 7 : 14 (IRVMR)
“आज मी माझी शांत्यर्पणे केली; [QBR] मी आपले नवस फेडले, [QBR]
नीतिसूत्रे 7 : 15 (IRVMR)
ह्यासाठी मी तुला भेटायला, [QBR] तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 16 (IRVMR)
मी आपल्या अंथरुणावर, [QBR] मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 17 (IRVMR)
मी आपले अंथरुण [QBR] बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 18 (IRVMR)
ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; [QBR] आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 19 (IRVMR)
माझा पती घरी नाही; [QBR] तो लांबच्या प्रवासास गेला आहे. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 20 (IRVMR)
त्याने प्रवासासाठी पैश्याची पिशवीबरोबर घेतली आहे; [QBR] तो पौर्णिमेच्या दिवशी परत घरी येईल.” [QBR]
नीतिसूत्रे 7 : 21 (IRVMR)
तिने आपल्या मोहक बोलण्याने त्याचे मन वळवले; [QBR] आणि आपल्या गोड बोलण्याने तिने त्यास सक्ती केली. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 22 (IRVMR)
तो तिच्यामागे चालला, [QBR] जसा बैल कापला जाण्यास जातो, [QBR] किंवा जसा हरीण सापळ्यात पकडला जातो, [QBR]
नीतिसूत्रे 7 : 23 (IRVMR)
जसा पक्षी, पाशाकडे धाव घेतो, [QBR] तसा हे आपल्या जीवाची किंमत घेण्यासाठी आहे हे तो जाणत नाही, [QBR] किंवा तिर त्याचे काळीज भेदून जाईपर्यंत तसा तो तिच्यामागे जातो. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 24 (IRVMR)
आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; [QBR] मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 25 (IRVMR)
तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस; [QBR] तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 26 (IRVMR)
कारण तिने पुष्कळांना घायाळ करून पाडले आहे, [QBR] त्यांची संख्या मोजू शकत नाही. [QBR]
नीतिसूत्रे 7 : 27 (IRVMR)
तिचे घर म्हणजे अधोलोकाकडचा मार्ग आहे; [QBR] तो मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरून जातो. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: