नीतिसूत्रे 7 : 1 (IRVMR)
व्याभिचारिणीच्या कारवाया माझ्या मुला, माझे शब्द जपून ठेव, आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव.
नीतिसूत्रे 7 : 2 (IRVMR)
माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत रहा, आणि माझे शिक्षण डोळ्यातील बाहुलीप्रमाणे जप.
नीतिसूत्रे 7 : 3 (IRVMR)
ती आपल्या बोटांस बांध; ती आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
नीतिसूत्रे 7 : 4 (IRVMR)
“तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण, आणि सुज्ञतेला आपले नातेवाईक म्हण,
नीतिसूत्रे 7 : 5 (IRVMR)
अशासाठी की, भुरळ घालणाऱ्या स्त्रीपासून, ते तुला व्यभिचारी स्त्रीच्या गोड शब्दांपासून वाचवतील.
नीतिसूत्रे 7 : 6 (IRVMR)
माझ्या घराच्या खिडकीजवळील जाळ्यातून मी बाहेर पाहिले;
नीतिसूत्रे 7 : 7 (IRVMR)
आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता.
नीतिसूत्रे 7 : 8 (IRVMR)
तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे,
नीतिसूत्रे 7 : 9 (IRVMR)
त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात, रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला.
नीतिसूत्रे 7 : 10 (IRVMR)
आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते.
नीतिसूत्रे 7 : 11 (IRVMR)
ती वाचाळ व स्वच्छंदी असून, तिचे पाय घरी राहत नाही;
नीतिसूत्रे 7 : 12 (IRVMR)
कधी रस्त्यात, कधी बाजारात, प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते.
नीतिसूत्रे 7 : 13 (IRVMR)
मग तिने त्यास धरले आणि त्याची चुंबने घेतली; निर्लज्जपणे ती त्यास म्हणाली,
नीतिसूत्रे 7 : 14 (IRVMR)
“आज मी माझी शांत्यर्पणे केली; मी आपले नवस फेडले,
नीतिसूत्रे 7 : 15 (IRVMR)
ह्यासाठी मी तुला भेटायला, तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस.
नीतिसूत्रे 7 : 16 (IRVMR)
मी आपल्या अंथरुणावर, मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे.
नीतिसूत्रे 7 : 17 (IRVMR)
मी आपले अंथरुण बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे.
नीतिसूत्रे 7 : 18 (IRVMR)
ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ.
नीतिसूत्रे 7 : 19 (IRVMR)
माझा पती घरी नाही; तो लांबच्या प्रवासास गेला आहे.
नीतिसूत्रे 7 : 20 (IRVMR)
त्याने प्रवासासाठी पैश्याची पिशवीबरोबर घेतली आहे; तो पौर्णिमेच्या दिवशी परत घरी येईल.”
नीतिसूत्रे 7 : 21 (IRVMR)
तिने आपल्या मोहक बोलण्याने त्याचे मन वळवले; आणि आपल्या गोड बोलण्याने तिने त्यास सक्ती केली.
नीतिसूत्रे 7 : 22 (IRVMR)
तो तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, किंवा जसा हरीण सापळ्यात पकडला जातो,
नीतिसूत्रे 7 : 23 (IRVMR)
जसा पक्षी, पाशाकडे धाव घेतो, तसा हे आपल्या जीवाची किंमत घेण्यासाठी आहे हे तो जाणत नाही, किंवा तिर त्याचे काळीज भेदून जाईपर्यंत तसा तो तिच्यामागे जातो.
नीतिसूत्रे 7 : 24 (IRVMR)
आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या.
नीतिसूत्रे 7 : 25 (IRVMR)
तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस; तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस.
नीतिसूत्रे 7 : 26 (IRVMR)
कारण तिने पुष्कळांना घायाळ करून पाडले आहे, त्यांची संख्या मोजू शकत नाही.
नीतिसूत्रे 7 : 27 (IRVMR)
तिचे घर म्हणजे अधोलोकाकडचा मार्ग आहे; तो मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरून जातो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27