नीतिसूत्रे 8 : 1 (IRVMR)
{ज्ञानाची थोरवी} [PS] ज्ञान हाक मारित नाही काय? [QBR] सुज्ञपणा तिचा आवाज उंचावत नाही का? [QBR]
नीतिसूत्रे 8 : 2 (IRVMR)
रस्त्याच्याबाजूला टेकडीच्या माथ्यावर, [QBR] ज्ञान तिला चौकाकडे उभे करते. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 3 (IRVMR)
ते शहराच्या प्रवेशव्दाराजवळ, [QBR] शहराच्या वेशीजवळ, ती मोठ्याने हाक मारते. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 4 (IRVMR)
“लोकांनो, मी तुम्हास बोलावत आहे. [QBR] आणि मानवजातीच्या मुलांसाठी आवाज उंचावते. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 5 (IRVMR)
अहो भोळ्यांनो, तुम्ही समंजसपणा समजून घ्या [QBR] आणि तुम्ही कोणी ज्ञानाचा द्वेष करता, त्या तुम्ही सुबुद्ध हृदयाचे व्हा. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 6 (IRVMR)
ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, [QBR] आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन, [QBR]
नीतिसूत्रे 8 : 7 (IRVMR)
कारण माझे मुख खरे आहे तेच बोलते, [QBR] आणि माझ्या ओठांना वाईटाचा वीट आहे. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 8 (IRVMR)
माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; [QBR] त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 9 (IRVMR)
ज्या कोणाला समज आहे त्यास माझी सर्व वचने सरळ आहेत; [QBR] ज्या कोणाला ज्ञान प्राप्त झाले आहे त्यास माझी वचने योग्य आहेत. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 10 (IRVMR)
रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा, [QBR] आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 11 (IRVMR)
कारण मी, ज्ञान, मौल्यवान खड्यांपेक्षा उत्तम आहे; [QBR] त्याची आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही वस्तूशी माझी तुलना होऊ शकत नाही. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 12 (IRVMR)
मी, ज्ञान, चातुर्याबरोबर राहते, [QBR] आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहे. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 13 (IRVMR)
परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे; [QBR] मी गर्व, अभिमान, वाईट मार्ग [QBR] व कुटिल वाणी यांचा मी द्वेष करते. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 14 (IRVMR)
चांगला सल्ला आणि सुज्ञान ही माझी आहेत; [QBR] मला ज्ञान आहे आणि सामर्थ्य ही माझी आहेत. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 15 (IRVMR)
माझ्याद्वारे राजे [QBR] सरदारसुद्धा राज्य करतात आणि सर्व अधिकारी न्यायाने कारभार चालवतात. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 16 (IRVMR)
माझ्याद्वारे राजपुत्र [QBR] आणि सरदार व सर्व कोणी न्यायाधीश अधिकार चालवतात. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 17 (IRVMR)
माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; [QBR] आणि जे मला परिश्रमाने शोधतात, त्यांना मी सापडते. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 18 (IRVMR)
धन व सन्मान, टिकणारी संपत्ती व सदाचरण ही माझ्याजवळ आहे. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 19 (IRVMR)
माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षाही उत्तम आहे; [QBR] मी जे काही उत्पन्न करतो ते शुद्ध रुप्यापेक्षा उत्तम आहे. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 20 (IRVMR)
जो योग्य मार्ग आहे त्याने मी चालते, [QBR] ती वाट न्यायाकडे नेते, [QBR]
नीतिसूत्रे 8 : 21 (IRVMR)
म्हणून जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी वडिलोपार्जित मिळकत [* धनसंपत्ती] देते. [QBR] आणि त्यांची भांडारे भरते. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 22 (IRVMR)
परमेश्वराने सुरवातीपासून आपल्या पुरातन कृत्यातले [QBR] पहिले कृत्य असे मला निर्माण केले. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 23 (IRVMR)
अनादिकाली, प्रारंभापासून [QBR] पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 24 (IRVMR)
जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते. [QBR] तेव्हा माझा जन्म झाला; [QBR]
नीतिसूत्रे 8 : 25 (IRVMR)
पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, [QBR] आणि टेकड्यापूर्वी, माझा जन्म झाला. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 26 (IRVMR)
परमेश्वराने पृथ्वी व शेत [QBR] किंवा पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच मी जन्मले. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 27 (IRVMR)
जेव्हा त्याने आकाशाची स्थापना केली तेव्हा मी तिथे होते, [QBR] जेव्हा त्याने जलाशयाची वर्तुळाकार सीमा आखली. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 28 (IRVMR)
जेव्हा त्याने आकाश वर स्थापित केले तेव्हा मी होते आणि, [QBR] जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 29 (IRVMR)
जेव्हा त्याने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. [QBR] पाण्याने त्याच्या आज्ञेच उल्लंघन करून पसरू नये, [QBR] आणि जेव्हा त्याने आज्ञा केली पृथ्वीचा पाया जेथे असायला पाहिजे तेथे मी होते. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 30 (IRVMR)
तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागिर होते, [QBR] दिवसेंदिवस मी आनंदाने भरत होतो, [QBR] मी त्याच्यासमोर सर्वदा हर्ष करीत असे. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 31 (IRVMR)
मी त्याच्या संपूर्ण पृथ्वीवर हर्ष करी, [QBR] आणि मनुष्यजातीच्या ठायी माझा आनंद होता. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 32 (IRVMR)
तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, [QBR] जे माझे मार्ग अनुसरतात ते धन्य आहेत. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 33 (IRVMR)
माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा; [QBR] दुर्लक्ष करू नका. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 34 (IRVMR)
जो माझे ऐकतो तो सुखी होईल [QBR] तो माझ्या दारांशी प्रत्येक दिवशी जागत राहतो; [QBR] तो माझ्या घराच्या दाराजवळ माझ्यासाठी थांबतो. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 35 (IRVMR)
कारण ज्याला मी सापडते, त्यास जीवन सापडते, [QBR] आणि त्यास परमेश्वराकडून अनुग्रह मिळतो. [QBR]
नीतिसूत्रे 8 : 36 (IRVMR)
पण जो कोणी मला शोधण्यास अयशस्वी होतो, जिवाची हानी करून घेतो; [QBR] जे सर्व कोणी माझा द्वेष करतात, त्यांना मरण प्रिय आहे.” [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: