नीतिसूत्रे 9 : 1 (IRVMR)
ज्ञान आणि अज्ञान ह्यांची घोषणा ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले; त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले.
नीतिसूत्रे 9 : 2 (IRVMR)
तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत; तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे; आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे, तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे.
नीतिसूत्रे 9 : 3 (IRVMR)
तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः
नीतिसूत्रे 9 : 4 (IRVMR)
“जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते.
नीतिसूत्रे 9 : 5 (IRVMR)
“या, माझे अन्न खा. आणि मी मिसळलेला द्राक्षरस प्या.
नीतिसूत्रे 9 : 6 (IRVMR)
तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.”
नीतिसूत्रे 9 : 7 (IRVMR)
जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो.
नीतिसूत्रे 9 : 8 (IRVMR)
निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल; ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील.
नीतिसूत्रे 9 : 9 (IRVMR)
ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल; नितीमान मनुष्यास शिक्षण दिले तर तो शिक्षणात अधिक वाढेल.
नीतिसूत्रे 9 : 10 (IRVMR)
परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे, आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे.
नीतिसूत्रे 9 : 11 (IRVMR)
कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील.
नीतिसूत्रे 9 : 12 (IRVMR)
जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील.
नीतिसूत्रे 9 : 13 (IRVMR)
मूर्ख स्त्री गोंगाट करणाऱ्यासारखी आहे, ती अज्ञानी आहे आणि तिला काही कळत नाही.
नीतिसूत्रे 9 : 14 (IRVMR)
ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते.
नीतिसूत्रे 9 : 15 (IRVMR)
जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात, जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते,
नीतिसूत्रे 9 : 16 (IRVMR)
“जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते.
नीतिसूत्रे 9 : 17 (IRVMR)
“चोरलेले पाणी गोड लागते, आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.”
नीतिसूत्रे 9 : 18 (IRVMR)
पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही, तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18