नीतिसूत्रे 9 : 1 (IRVMR)
{ज्ञान आणि अज्ञान ह्यांची घोषणा} [PS] ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले; [QBR] त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 2 (IRVMR)
तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत; [QBR] तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे; [QBR] आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे, [QBR] तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 3 (IRVMR)
तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि [QBR] ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः [QBR]
नीतिसूत्रे 9 : 4 (IRVMR)
“जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” [QBR] ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 5 (IRVMR)
“या, माझे अन्न खा. [QBR] आणि मी मिसळलेला द्राक्षरस प्या. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 6 (IRVMR)
तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; [QBR] सुज्ञानाच्या मार्गाने चला.” [QBR]
नीतिसूत्रे 9 : 7 (IRVMR)
जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, [QBR] आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 8 (IRVMR)
निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल; [QBR] ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 9 (IRVMR)
ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल; [QBR] नितीमान मनुष्यास शिक्षण दिले तर तो शिक्षणात अधिक वाढेल. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 10 (IRVMR)
परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे, [QBR] आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 11 (IRVMR)
कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, [QBR] आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 12 (IRVMR)
जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, [QBR] पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 13 (IRVMR)
मूर्ख स्त्री गोंगाट करणाऱ्यासारखी आहे, [QBR] ती अज्ञानी आहे आणि तिला काही कळत नाही. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 14 (IRVMR)
ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, [QBR] ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 15 (IRVMR)
जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात, [QBR] जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते, [QBR]
नीतिसूत्रे 9 : 16 (IRVMR)
“जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” [QBR] जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते. [QBR]
नीतिसूत्रे 9 : 17 (IRVMR)
“चोरलेले पाणी गोड लागते, [QBR] आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.” [QBR]
नीतिसूत्रे 9 : 18 (IRVMR)
पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही, [QBR] तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: