स्तोत्रसंहिता 1 : 1 (IRVMR)
{नीतिमान व अनीतिमान} [PS] आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, [QBR] किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, [QBR] आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 1 : 2 (IRVMR)
परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, [QBR] आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 1 : 3 (IRVMR)
तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, [QBR] आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, [QBR] ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, [QBR] अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 1 : 4 (IRVMR)
परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 1 : 5 (IRVMR)
म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत. [QBR]
स्तोत्रसंहिता 1 : 6 (IRVMR)
कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. [QBR] परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल. [PE]

1 2 3 4 5 6

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: