स्तोत्रसंहिता 100 : 1 (IRVMR)
{उपकारस्तुती करण्याचा आदेश} [PS] हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 100 : 2 (IRVMR)
परमेश्वराची सेवा आनंदाने करा. [QBR] त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या. [QBR]
स्तोत्रसंहिता 100 : 3 (IRVMR)
परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या. [QBR] त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत. [QBR] आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 100 : 4 (IRVMR)
त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, [QBR] आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. [QBR] त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या. [QBR]
स्तोत्रसंहिता 100 : 5 (IRVMR)
कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, [QBR] आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे. [PE]

1 2 3 4 5

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: