{नीतीने वागण्याची प्रतिज्ञा} [PS] मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; [QBR] हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन; [QBR]
स्तोत्रसंहिता 101 : 2 (IRVMR)
मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. [QBR] अहा, तू माझ्याकडे कधी येशील? [QBR] मी माझ्या घरात सचोटीने चालेन. [QBR]
स्तोत्रसंहिता 101 : 3 (IRVMR)
मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; [QBR] अनाचाराचा मी द्वेष करतो; [QBR] तो मला बिलगणार नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 101 : 4 (IRVMR)
हेकेखोर लोक मला सोडतील; [QBR] मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 101 : 5 (IRVMR)
आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. [QBR] जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 101 : 6 (IRVMR)
देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; [QBR] जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 101 : 7 (IRVMR)
कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; [QBR] लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 101 : 8 (IRVMR)
देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; [QBR] वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन. [PE]