स्तोत्रसंहिता 102 : 1 (IRVMR)
विपत्तीत धावा परमेश्वराजवळ प्रार्थना हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
स्तोत्रसंहिता 102 : 2 (IRVMR)
मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे.
स्तोत्रसंहिता 102 : 3 (IRVMR)
कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे, आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत.
स्तोत्रसंहिता 102 : 4 (IRVMR)
माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे. मी जेवण खाण्यास असमर्थ आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 5 (IRVMR)
माझ्या सततच्या कण्हण्यामुळे, मी फार क्षीण झालो आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 6 (IRVMR)
मी अरण्यातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे. मी ओसाड ठिकाणातल्या गरुडाप्रमाणे झालो आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 7 (IRVMR)
मी जागरण करीत आहे; धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 8 (IRVMR)
माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात; ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात.
स्तोत्रसंहिता 102 : 9 (IRVMR)
मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे, आणि माझ्या पाण्यात माझे अश्रू मिसळले आहेत.
स्तोत्रसंहिता 102 : 10 (IRVMR)
कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे, तू मला वर उचलून घेऊन खाली फेकून दिलेस.
स्तोत्रसंहिता 102 : 11 (IRVMR)
माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत, आणि गवतासारखा मी कोमेजून गेलो आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 12 (IRVMR)
पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस, आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील.
स्तोत्रसंहिता 102 : 13 (IRVMR)
तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील. तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे; नेमलेला वेळ आला आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 14 (IRVMR)
कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात, आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो.
स्तोत्रसंहिता 102 : 15 (IRVMR)
हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील, आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील.
स्तोत्रसंहिता 102 : 16 (IRVMR)
परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल, आणि तो आपल्या गौरवाने प्रगट होईल.
स्तोत्रसंहिता 102 : 17 (IRVMR)
आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही.
स्तोत्रसंहिता 102 : 18 (IRVMR)
पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील.
स्तोत्रसंहिता 102 : 19 (IRVMR)
कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहीले आहे. परमेश्वराने स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहीले,
स्तोत्रसंहिता 102 : 20 (IRVMR)
तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल, ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली होती त्यास सोडविले.
स्तोत्रसंहिता 102 : 21 (IRVMR)
नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील, आणि यरूशलेमेत त्याची स्तुती करतील.
स्तोत्रसंहिता 102 : 22 (IRVMR)
जेव्हा परमेश्वराची एकत्र सेवा करण्यासाठी सगळी राष्ट्रे एकत्र येतील.
स्तोत्रसंहिता 102 : 23 (IRVMR)
त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली. त्याने माझे दिवस कमी केले.
स्तोत्रसंहिता 102 : 24 (IRVMR)
मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस; तू येथे सर्व पिढ्यानपिढ्यातून आहेस.
स्तोत्रसंहिता 102 : 25 (IRVMR)
तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला; आकाश तुझ्या हातचे कार्य आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 26 (IRVMR)
ते नाहीसे होईल, पण तू राहशील; ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील; कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील.
स्तोत्रसंहिता 102 : 27 (IRVMR)
पण तू सारखाच आहे, आणि तुझ्या वर्षांना अंत नाही.
स्तोत्रसंहिता 102 : 28 (IRVMR)
तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील, आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितीत इथे राहतील.”
❮
❯