स्तोत्रसंहिता 105 : 1 (IRVMR)
{इस्त्राएलासाठी देवाने केलेला चमत्कार} [PS] परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. [QBR] राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 2 (IRVMR)
त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; [QBR] त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला; [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 3 (IRVMR)
त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. [QBR] जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 4 (IRVMR)
परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. [QBR] त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 5 (IRVMR)
त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी, [QBR] त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 6 (IRVMR)
तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो, [QBR] तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो, [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 7 (IRVMR)
तो परमेश्वर आपला देव आहे. [QBR] त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 8 (IRVMR)
तो आपला करार म्हणजे [QBR] हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 9 (IRVMR)
त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला. [QBR] आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 10 (IRVMR)
ही त्याने याकोबासाठी नियम, [QBR] आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 11 (IRVMR)
तो म्हणाला, “मी तुला कनान देश [QBR] तुझा वतनभाग असा म्हणून देईन.” [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 12 (IRVMR)
हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते, [QBR] होय फार थोडे, आणि देशात परके होते. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 13 (IRVMR)
ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, [QBR] आणि एका राज्यातून दुसऱ्यात गेले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 14 (IRVMR)
त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; [QBR] त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 15 (IRVMR)
तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका, [QBR] आणि माझ्या संदेष्ट्यांची हानी करू नका. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 16 (IRVMR)
त्याने त्या देशात दुष्काळ आणला. [QBR] त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 17 (IRVMR)
त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; [QBR] योसेफ गुलाम म्हणून विकला गेला. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 18 (IRVMR)
त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; [QBR] त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 19 (IRVMR)
त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, [QBR] परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 20 (IRVMR)
तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; [QBR] लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 21 (IRVMR)
त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, [QBR] आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले, [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 22 (IRVMR)
अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, [QBR] आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 23 (IRVMR)
नंतर इस्राएल मिसरात आले, [QBR] आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 24 (IRVMR)
देवाने आपले लोक फारच वाढवले, [QBR] आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 25 (IRVMR)
आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा, [QBR] आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 26 (IRVMR)
त्याने आपला सेवक मोशे [QBR] आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 27 (IRVMR)
त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे, [QBR] हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 28 (IRVMR)
त्याने त्या देशात काळोख केला, [QBR] पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 29 (IRVMR)
त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले [QBR] आणि त्यांचे मासे मरण पावले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 30 (IRVMR)
त्यांचा देश बेडकांनी भरून गेला, [QBR] त्यांच्या अधिपतींच्या खोलीत देखील बेडूक होते. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 31 (IRVMR)
तो बोलला, आणि गोमाशा व उवा [QBR] त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 32 (IRVMR)
त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने [QBR] गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 33 (IRVMR)
त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला. [QBR] त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 34 (IRVMR)
तो बोलला आणि टोळ आले. [QBR] असंख्य नाकतोडे आले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 35 (IRVMR)
टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ, [QBR] त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले; [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 36 (IRVMR)
त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले, [QBR] त्यांच्या सामर्थ्याचे सर्व प्रथमफळ ठार मारले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 37 (IRVMR)
त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले; [QBR] त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 38 (IRVMR)
ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला, [QBR] कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 39 (IRVMR)
त्याने आच्छादनासाठी ढग पसरला, [QBR] आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 40 (IRVMR)
इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले, [QBR] आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 41 (IRVMR)
त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले; [QBR] ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 42 (IRVMR)
कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची, [QBR] आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 43 (IRVMR)
त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, [QBR] त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 44 (IRVMR)
त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले; [QBR] त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या. [QBR]
स्तोत्रसंहिता 105 : 45 (IRVMR)
ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम [QBR] आणि आपले नियमशास्त्र पाळावे. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: