स्तोत्रसंहिता 108 : 1 (IRVMR)
शत्रूंविरुद्ध साहाय्याची याचना
स्तोत्र. 57:7-11; 60:5-12
दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.
स्तोत्रसंहिता 108 : 2 (IRVMR)
हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा. मी पहाटेला जागे करीन.
स्तोत्रसंहिता 108 : 3 (IRVMR)
हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन; मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन.
स्तोत्रसंहिता 108 : 4 (IRVMR)
कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे; आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.
स्तोत्रसंहिता 108 : 5 (IRVMR)
हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे. आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो.
स्तोत्रसंहिता 108 : 6 (IRVMR)
म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे, तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे.
स्तोत्रसंहिता 108 : 7 (IRVMR)
देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
स्तोत्रसंहिता 108 : 8 (IRVMR)
गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे. एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे. यहूदा माझा राजदंड आहे.
स्तोत्रसंहिता 108 : 9 (IRVMR)
मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन. मी पलिष्टीया विषयी विजयाने आरोळी करीन.”
स्तोत्रसंहिता 108 : 10 (IRVMR)
तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? मला अदोमात कोण नेईल?
स्तोत्रसंहिता 108 : 11 (IRVMR)
हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का? तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस.
स्तोत्रसंहिता 108 : 12 (IRVMR)
आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे.
स्तोत्रसंहिता 108 : 13 (IRVMR)
देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ; तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13