स्तोत्रसंहिता 109 : 1 (IRVMR)
{सूडासाठी याचना} [PS] हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 2 (IRVMR)
कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात; [QBR] ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 3 (IRVMR)
त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात. [QBR] आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 4 (IRVMR)
माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात. [QBR] पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 5 (IRVMR)
मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, [QBR] आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 6 (IRVMR)
या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम; [QBR] त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 7 (IRVMR)
जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो; [QBR] त्याची प्रार्थना पापच मानली जावो. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 8 (IRVMR)
त्याचे दिवस थोडे होवोत; [QBR] दुसरा त्याचा अधिकार घेवो; [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 9 (IRVMR)
त्याची मुले पितृहीन [QBR] आणि त्याची पत्नी विधवा होवो. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 10 (IRVMR)
त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, [QBR] ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 11 (IRVMR)
सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; [QBR] त्याची कमाई परके लुटून घेवोत; [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 12 (IRVMR)
त्यांना कोणीही दया देऊ नये; [QBR] त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 13 (IRVMR)
त्याचे वंशज कापून टाकली जावोत; [QBR] पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 14 (IRVMR)
परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. [QBR] त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 15 (IRVMR)
परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; [QBR] परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 16 (IRVMR)
कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, [QBR] परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत [QBR] व धैर्य खचलेल्यांचा वध केला. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 17 (IRVMR)
त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला. [QBR] त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 18 (IRVMR)
त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले, [QBR] आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात, [QBR] तेलासारखे त्याच्या हाडात आले. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 19 (IRVMR)
त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो, [QBR] ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 20 (IRVMR)
माझ्या आरोप्यास, [QBR] माझ्याविरूद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 21 (IRVMR)
हे परमेश्वरा, माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागवून घे. [QBR] कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे म्हणून मला वाचव. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 22 (IRVMR)
कारण मी पीडित आणि गरजवंत आहे, [QBR] आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 23 (IRVMR)
मी संध्याकाळच्या सावल्यांप्रमाणे दिसेनासा झालो आहे; [QBR] मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 24 (IRVMR)
उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत; [QBR] मी त्वचा आणि हाडे असा होत आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 25 (IRVMR)
माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे, [QBR] ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 26 (IRVMR)
हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर; [QBR] तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 27 (IRVMR)
हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की, [QBR] ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 28 (IRVMR)
जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे; [QBR] जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील, [QBR] परंतु तुझा सेवक आनंदी होईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 29 (IRVMR)
माझे विरोधी वस्राप्रमाणे लाज पांघरतील, [QBR] आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 30 (IRVMR)
मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन; [QBR] लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन. [QBR]
स्तोत्रसंहिता 109 : 31 (IRVMR)
कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून, [QBR] त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: