स्तोत्रसंहिता 109 : 1 (IRVMR)
सूडासाठी याचना दाविदाचे स्तोत्र हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको.
स्तोत्रसंहिता 109 : 2 (IRVMR)
कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात; ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात.
स्तोत्रसंहिता 109 : 3 (IRVMR)
त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात. आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात.
स्तोत्रसंहिता 109 : 4 (IRVMR)
माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात. पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.
स्तोत्रसंहिता 109 : 5 (IRVMR)
मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली.
स्तोत्रसंहिता 109 : 6 (IRVMR)
या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम; त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव.
स्तोत्रसंहिता 109 : 7 (IRVMR)
जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो; त्याची प्रार्थना पापच मानली जावो.
स्तोत्रसंहिता 109 : 8 (IRVMR)
त्याचे दिवस थोडे होवोत; दुसरा त्याचा अधिकार घेवो;
स्तोत्रसंहिता 109 : 9 (IRVMR)
त्याची मुले पितृहीन आणि त्याची पत्नी विधवा होवो.
स्तोत्रसंहिता 109 : 10 (IRVMR)
त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत.
स्तोत्रसंहिता 109 : 11 (IRVMR)
सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कमाई परके लुटून घेवोत;
स्तोत्रसंहिता 109 : 12 (IRVMR)
त्यांना कोणीही दया देऊ नये; त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये.
स्तोत्रसंहिता 109 : 13 (IRVMR)
त्याचे वंशज कापून टाकली जावोत; पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो.
स्तोत्रसंहिता 109 : 14 (IRVMR)
परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत.
स्तोत्रसंहिता 109 : 15 (IRVMR)
परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको.
स्तोत्रसंहिता 109 : 16 (IRVMR)
कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत व धैर्य खचलेल्यांचा वध केला.
स्तोत्रसंहिता 109 : 17 (IRVMR)
त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला. त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत.
स्तोत्रसंहिता 109 : 18 (IRVMR)
त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले, आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात, तेलासारखे त्याच्या हाडात आले.
स्तोत्रसंहिता 109 : 19 (IRVMR)
त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो, ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो.
स्तोत्रसंहिता 109 : 20 (IRVMR)
माझ्या आरोप्यास, माझ्याविरूद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे
स्तोत्रसंहिता 109 : 21 (IRVMR)
हे परमेश्वरा, माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागवून घे. कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे म्हणून मला वाचव.
स्तोत्रसंहिता 109 : 22 (IRVMR)
कारण मी पीडित आणि गरजवंत आहे, आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे.
स्तोत्रसंहिता 109 : 23 (IRVMR)
मी संध्याकाळच्या सावल्यांप्रमाणे दिसेनासा झालो आहे; मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे.
स्तोत्रसंहिता 109 : 24 (IRVMR)
उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत; मी त्वचा आणि हाडे असा होत आहे.
स्तोत्रसंहिता 109 : 25 (IRVMR)
माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे, ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात.
स्तोत्रसंहिता 109 : 26 (IRVMR)
हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर; तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर.
स्तोत्रसंहिता 109 : 27 (IRVMR)
हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की, ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस.
स्तोत्रसंहिता 109 : 28 (IRVMR)
जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे; जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील, परंतु तुझा सेवक आनंदी होईल.
स्तोत्रसंहिता 109 : 29 (IRVMR)
माझे विरोधी वस्राप्रमाणे लाज पांघरतील, आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील.
स्तोत्रसंहिता 109 : 30 (IRVMR)
मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन; लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन.
स्तोत्रसंहिता 109 : 31 (IRVMR)
कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून, त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो.
❮
❯