स्तोत्रसंहिता 11 : 1 (IRVMR)
सरळतेने चालणाऱ्याचा आधार *मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता?
स्तोत्रसंहिता 11 : 2 (IRVMR)
कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात.
स्तोत्रसंहिता 11 : 3 (IRVMR)
कारण जर पायेच नष्ट केले, तर न्यायी काय करणार?
स्तोत्रसंहिता 11 : 4 (IRVMR)
परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात.
स्तोत्रसंहिता 11 : 5 (IRVMR)
परमेश्वर नितीमानाची पारख करतो. परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो.
स्तोत्रसंहिता 11 : 6 (IRVMR)
तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल.
स्तोत्रसंहिता 11 : 7 (IRVMR)
कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.
❮
❯