स्तोत्रसंहिता 110 : 1 (IRVMR)
देव राजाला राज्य देतो
मत्त. 22:44; प्रेषि. 2:34-35
दाविदाचे स्तोत्र माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.”
स्तोत्रसंहिता 110 : 2 (IRVMR)
परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.
स्तोत्रसंहिता 110 : 3 (IRVMR)
तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.
स्तोत्रसंहिता 110 : 4 (IRVMR)
परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.”
स्तोत्रसंहिता 110 : 5 (IRVMR)
प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील.
स्तोत्रसंहिता 110 : 6 (IRVMR)
तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील.
स्तोत्रसंहिता 110 : 7 (IRVMR)
तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.

1 2 3 4 5 6 7