स्तोत्रसंहिता 111 : 1 (IRVMR)
{परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो} [PS] परमेश्वराची स्तुती करा. [QBR] सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 111 : 2 (IRVMR)
परमेश्वराचे कार्य महान आहेत, [QBR] जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 111 : 3 (IRVMR)
त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, [QBR] आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते. [QBR]
स्तोत्रसंहिता 111 : 4 (IRVMR)
त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले; [QBR] परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 111 : 5 (IRVMR)
तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. [QBR] तो आपला करार नेहमी आठवतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 111 : 6 (IRVMR)
त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन, [QBR] आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 111 : 7 (IRVMR)
त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; [QBR] त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 111 : 8 (IRVMR)
ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, [QBR] ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 111 : 9 (IRVMR)
त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे; [QBR] त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, [QBR] देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 111 : 10 (IRVMR)
परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; [QBR] जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. [QBR] त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: