स्तोत्रसंहिता 112 : 1 (IRVMR)
परमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराट परमेश्वराची स्तुती करा. जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे.
स्तोत्रसंहिता 112 : 2 (IRVMR)
त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील.
स्तोत्रसंहिता 112 : 3 (IRVMR)
धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते.
स्तोत्रसंहिता 112 : 4 (IRVMR)
धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.
स्तोत्रसंहिता 112 : 5 (IRVMR)
जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते.
स्तोत्रसंहिता 112 : 6 (IRVMR)
कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील.
स्तोत्रसंहिता 112 : 7 (IRVMR)
तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे.
स्तोत्रसंहिता 112 : 8 (IRVMR)
त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही.
स्तोत्रसंहिता 112 : 9 (IRVMR)
तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल.
स्तोत्रसंहिता 112 : 10 (IRVMR)
दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10