स्तोत्रसंहिता 113 : 1 (IRVMR)
{दीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती} [PS] परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 113 : 2 (IRVMR)
आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो. [QBR]
स्तोत्रसंहिता 113 : 3 (IRVMR)
सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो. [QBR]
स्तोत्रसंहिता 113 : 4 (IRVMR)
परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो. [QBR]
स्तोत्रसंहिता 113 : 5 (IRVMR)
आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे, [QBR]
स्तोत्रसंहिता 113 : 6 (IRVMR)
जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो, [QBR]
स्तोत्रसंहिता 113 : 7 (IRVMR)
तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 113 : 8 (IRVMR)
अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे. [QBR]
स्तोत्रसंहिता 113 : 9 (IRVMR)
अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: