स्तोत्रसंहिता 114 : 1 (IRVMR)
आश्चर्यकारक निर्गमन
निर्ग. 14:1-31
जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,
स्तोत्रसंहिता 114 : 2 (IRVMR)
तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले.
स्तोत्रसंहिता 114 : 3 (IRVMR)
समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली.
स्तोत्रसंहिता 114 : 4 (IRVMR)
पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.
स्तोत्रसंहिता 114 : 5 (IRVMR)
हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस?
स्तोत्रसंहिता 114 : 6 (IRVMR)
पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?
स्तोत्रसंहिता 114 : 7 (IRVMR)
हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप.
स्तोत्रसंहिता 114 : 8 (IRVMR)
तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.

1 2 3 4 5 6 7 8