स्तोत्रसंहिता 115 : 1 (IRVMR)
देव आणि मूर्ती हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको, तर आपल्या नावाचा सन्मान कर, कारण तू दयाळू आणि सत्य आहेस.
स्तोत्रसंहिता 115 : 2 (IRVMR)
ह्यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे?
स्तोत्रसंहिता 115 : 3 (IRVMR)
आमचा देव स्वर्गात आहे; त्यास जे आवडते ते तो करतो.
स्तोत्रसंहिता 115 : 4 (IRVMR)
राष्ट्रांच्या मूर्ती सोन्याच्या व रुप्याच्या आहेत. त्या मनुष्यांच्या हातचे काम आहेत.
स्तोत्रसंहिता 115 : 5 (IRVMR)
त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही.
स्तोत्रसंहिता 115 : 6 (IRVMR)
त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही.
स्तोत्रसंहिता 115 : 7 (IRVMR)
त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही. त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही; किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही.
स्तोत्रसंहिता 115 : 8 (IRVMR)
जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच, त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे.
स्तोत्रसंहिता 115 : 9 (IRVMR)
हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव. तो त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.
स्तोत्रसंहिता 115 : 10 (IRVMR)
हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर विश्वास ठेव; तोच त्याचे सहाय्य आणि ढाल आहे.
स्तोत्रसंहिता 115 : 11 (IRVMR)
अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.
स्तोत्रसंहिता 115 : 12 (IRVMR)
परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हास आशीर्वाद देईल. तो इस्राएलाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तो अहरोनाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
स्तोत्रसंहिता 115 : 13 (IRVMR)
जे परमेश्वराचा आदर करतात, त्या तरुण आणि वृद्ध या दोघांना तो आशीर्वाद देईल.
स्तोत्रसंहिता 115 : 14 (IRVMR)
परमेश्वर तुम्हास अधिकाधिक वाढवो, तो तुमची आणि तुमच्या वंशजांची वाढ करो.
स्तोत्रसंहिता 115 : 15 (IRVMR)
आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुम्हास आशीर्वाद असो.
स्तोत्रसंहिता 115 : 16 (IRVMR)
स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण त्यांने मानवजातीला पृथ्वी दिली आहे.
स्तोत्रसंहिता 115 : 17 (IRVMR)
मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
स्तोत्रसंहिता 115 : 18 (IRVMR)
पण आम्ही आता आणि सदासर्वकाळ परमेश्वरास धन्यवाद देत राहू. परमेश्वराची स्तुती करा.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18