स्तोत्रसंहिता 116 : 1 (IRVMR)
मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकारस्तुती मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.
स्तोत्रसंहिता 116 : 2 (IRVMR)
कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.
स्तोत्रसंहिता 116 : 3 (IRVMR)
मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले.
स्तोत्रसंहिता 116 : 4 (IRVMR)
नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”
स्तोत्रसंहिता 116 : 5 (IRVMR)
परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.
स्तोत्रसंहिता 116 : 6 (IRVMR)
परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.
स्तोत्रसंहिता 116 : 7 (IRVMR)
हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.
स्तोत्रसंहिता 116 : 8 (IRVMR)
तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत.
स्तोत्रसंहिता 116 : 9 (IRVMR)
जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.
स्तोत्रसंहिता 116 : 10 (IRVMR)
मी फार पीडित आहे असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे.
स्तोत्रसंहिता 116 : 11 (IRVMR)
मी अविचाराने म्हणालो की, सगळे माणसे खोटारडे आहेत.
स्तोत्रसंहिता 116 : 12 (IRVMR)
परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?
स्तोत्रसंहिता 116 : 13 (IRVMR)
मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.
स्तोत्रसंहिता 116 : 14 (IRVMR)
त्याच्या सर्व लोकांसमोर, मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
स्तोत्रसंहिता 116 : 15 (IRVMR)
परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे.
स्तोत्रसंहिता 116 : 16 (IRVMR)
हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; माझी बंधने तू सोडली आहेस.
स्तोत्रसंहिता 116 : 17 (IRVMR)
मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
स्तोत्रसंहिता 116 : 18 (IRVMR)
मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
स्तोत्रसंहिता 116 : 19 (IRVMR)
परमेश्वराच्या घराच्या अंगणात, यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराची स्तुती करा.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19