स्तोत्रसंहिता 118 : 1 (IRVMR)
परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकारस्तुती परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
स्तोत्रसंहिता 118 : 2 (IRVMR)
इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
स्तोत्रसंहिता 118 : 3 (IRVMR)
अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
स्तोत्रसंहिता 118 : 4 (IRVMR)
परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
स्तोत्रसंहिता 118 : 5 (IRVMR)
मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
स्तोत्रसंहिता 118 : 6 (IRVMR)
परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल?
स्तोत्रसंहिता 118 : 7 (IRVMR)
माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन.
स्तोत्रसंहिता 118 : 8 (IRVMR)
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.
स्तोत्रसंहिता 118 : 9 (IRVMR)
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.
स्तोत्रसंहिता 118 : 10 (IRVMR)
सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन.
स्तोत्रसंहिता 118 : 11 (IRVMR)
त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
स्तोत्रसंहिता 118 : 12 (IRVMR)
त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
स्तोत्रसंहिता 118 : 13 (IRVMR)
मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली.
स्तोत्रसंहिता 118 : 14 (IRVMR)
परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे.
स्तोत्रसंहिता 118 : 15 (IRVMR)
उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
स्तोत्रसंहिता 118 : 16 (IRVMR)
परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
स्तोत्रसंहिता 118 : 17 (IRVMR)
मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.
स्तोत्रसंहिता 118 : 18 (IRVMR)
परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही.
स्तोत्रसंहिता 118 : 19 (IRVMR)
माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन.
स्तोत्रसंहिता 118 : 20 (IRVMR)
हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील.
स्तोत्रसंहिता 118 : 21 (IRVMR)
मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस.
स्तोत्रसंहिता 118 : 22 (IRVMR)
इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे.
स्तोत्रसंहिता 118 : 23 (IRVMR)
परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.
स्तोत्रसंहिता 118 : 24 (IRVMR)
परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण आनंद व उल्लास करू.
स्तोत्रसंहिता 118 : 25 (IRVMR)
हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर.
स्तोत्रसंहिता 118 : 26 (IRVMR)
परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो.
स्तोत्रसंहिता 118 : 27 (IRVMR)
परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा.
स्तोत्रसंहिता 118 : 28 (IRVMR)
तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन.
स्तोत्रसंहिता 118 : 29 (IRVMR)
अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
❮
❯