स्तोत्रसंहिता 119 : 1 (IRVMR)
देवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र आलेफ ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते आशीर्वादित आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 2 (IRVMR)
जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 3 (IRVMR)
ते चुकीचे करीत नाहीत; ते त्याच्या मार्गात चालतात.
स्तोत्रसंहिता 119 : 4 (IRVMR)
तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 5 (IRVMR)
मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 6 (IRVMR)
मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन तेव्हा मी कधीही लाजणार नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 7 (IRVMR)
मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन, तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन.
स्तोत्रसंहिता 119 : 8 (IRVMR)
मी तुझे नियम पाळीन; मला एकट्याला सोडू नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 9 (IRVMR)
बेथ तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
स्तोत्रसंहिता 119 : 10 (IRVMR)
मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 11 (IRVMR)
मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 12 (IRVMR)
हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; मला तुझे नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 13 (IRVMR)
मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन.
स्तोत्रसंहिता 119 : 14 (IRVMR)
तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 15 (IRVMR)
मी तुझ्या नियमांचे मनन करीन, आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.
स्तोत्रसंहिता 119 : 16 (IRVMR)
मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 17 (IRVMR)
गीमेल आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे, आणि तुझे वचन पाळावे.
स्तोत्रसंहिता 119 : 18 (IRVMR)
माझे डोळे उघड म्हणजे तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
स्तोत्रसंहिता 119 : 19 (IRVMR)
मी या देशात परका आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 20 (IRVMR)
तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव चिरडून गेला आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 21 (IRVMR)
तू गर्विष्ठांना रागावतोस, तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 22 (IRVMR)
माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 23 (IRVMR)
अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात, तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 24 (IRVMR)
तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे, आणि ते माझे सल्लागार आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 25 (IRVMR)
दालेथ माझा जीव धुळीस चिकटून आहे; आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
स्तोत्रसंहिता 119 : 26 (IRVMR)
मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; तू मला आपले नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 27 (IRVMR)
मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे. यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे.
स्तोत्रसंहिता 119 : 28 (IRVMR)
माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर.
स्तोत्रसंहिता 119 : 29 (IRVMR)
असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव.
स्तोत्रसंहिता 119 : 30 (IRVMR)
मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 31 (IRVMR)
मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 32 (IRVMR)
मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस.
स्तोत्रसंहिता 119 : 33 (IRVMR)
हे हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन.
स्तोत्रसंहिता 119 : 34 (IRVMR)
मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 35 (IRVMR)
तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 36 (IRVMR)
माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.
स्तोत्रसंहिता 119 : 37 (IRVMR)
निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर.
स्तोत्रसंहिता 119 : 38 (IRVMR)
तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर.
स्तोत्रसंहिता 119 : 39 (IRVMR)
ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 40 (IRVMR)
पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.
स्तोत्रसंहिता 119 : 41 (IRVMR)
वाव हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो.
स्तोत्रसंहिता 119 : 42 (IRVMR)
जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 43 (IRVMR)
तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 44 (IRVMR)
मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 45 (IRVMR)
मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 46 (IRVMR)
मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 47 (IRVMR)
मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 48 (IRVMR)
ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
स्तोत्रसंहिता 119 : 49 (IRVMR)
जायिन तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस.
स्तोत्रसंहिता 119 : 50 (IRVMR)
माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते;
स्तोत्रसंहिता 119 : 51 (IRVMR)
गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 52 (IRVMR)
हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो, आणि मी आपले समाधान करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 53 (IRVMR)
दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात, म्हणून संताप माझा ताबा घेतो.
स्तोत्रसंहिता 119 : 54 (IRVMR)
ज्या घरात मी तात्पुरता राहतो; तुझे नियम मला माझे गीत झाले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 55 (IRVMR)
हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो, आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो.
स्तोत्रसंहिता 119 : 56 (IRVMR)
हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 57 (IRVMR)
खेथ परमेश्वर माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 58 (IRVMR)
मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर;
स्तोत्रसंहिता 119 : 59 (IRVMR)
मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली.
स्तोत्रसंहिता 119 : 60 (IRVMR)
मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली, आणि मी उशीर केला नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 61 (IRVMR)
दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे; तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 62 (IRVMR)
मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
स्तोत्रसंहिता 119 : 63 (IRVMR)
तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा, मी साथीदार आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 64 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने सर्व पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 65 (IRVMR)
ठेथ हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे, आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस.
स्तोत्रसंहिता 119 : 66 (IRVMR)
योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 67 (IRVMR)
पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 68 (IRVMR)
तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 69 (IRVMR)
गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 70 (IRVMR)
त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 71 (IRVMR)
मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.
स्तोत्रसंहिता 119 : 72 (IRVMR)
सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा, मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 73 (IRVMR)
योद तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन.
स्तोत्रसंहिता 119 : 74 (IRVMR)
तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 75 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 76 (IRVMR)
तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार, आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर.
स्तोत्रसंहिता 119 : 77 (IRVMR)
मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 78 (IRVMR)
गर्विष्ठ लज्जित होवोत, कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; पण मी तुझ्या विधींचे मनन करीन;
स्तोत्रसंहिता 119 : 79 (IRVMR)
तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.
स्तोत्रसंहिता 119 : 80 (IRVMR)
मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने, तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे.
स्तोत्रसंहिता 119 : 81 (IRVMR)
काफ मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 82 (IRVMR)
माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; तू माझे सांत्वन कधी करशील?
स्तोत्रसंहिता 119 : 83 (IRVMR)
कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 84 (IRVMR)
तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील?
स्तोत्रसंहिता 119 : 85 (IRVMR)
गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत, तुझे नियमशास्त्र झुगारले आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 86 (IRVMR)
तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर.
स्तोत्रसंहिता 119 : 87 (IRVMR)
त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; पण मी तुझे विधी नाकारले नाहीत.
स्तोत्रसंहिता 119 : 88 (IRVMR)
तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 89 (IRVMR)
लामेद हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 90 (IRVMR)
तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते.
स्तोत्रसंहिता 119 : 91 (IRVMR)
त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात.
स्तोत्रसंहिता 119 : 92 (IRVMR)
जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता.
स्तोत्रसंहिता 119 : 93 (IRVMR)
मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 94 (IRVMR)
मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 95 (IRVMR)
दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन.
स्तोत्रसंहिता 119 : 96 (IRVMR)
प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 97 (IRVMR)
मेम अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 98 (IRVMR)
तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 99 (IRVMR)
माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 100 (IRVMR)
वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो.
स्तोत्रसंहिता 119 : 101 (IRVMR)
तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे.
स्तोत्रसंहिता 119 : 102 (IRVMR)
मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 103 (IRVMR)
तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 104 (IRVMR)
तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 105 (IRVMR)
नून तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 106 (IRVMR)
तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 107 (IRVMR)
मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव.
स्तोत्रसंहिता 119 : 108 (IRVMR)
हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 109 (IRVMR)
माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 110 (IRVMR)
दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 111 (IRVMR)
तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.
स्तोत्रसंहिता 119 : 112 (IRVMR)
तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 113 (IRVMR)
सामेख परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
स्तोत्रसंहिता 119 : 114 (IRVMR)
मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 115 (IRVMR)
वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 116 (IRVMR)
तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 117 (IRVMR)
मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन; मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन.
स्तोत्रसंहिता 119 : 118 (IRVMR)
तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 119 (IRVMR)
पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो; म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 120 (IRVMR)
तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते.
स्तोत्रसंहिता 119 : 121 (IRVMR)
ऐन मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको.
स्तोत्रसंहिता 119 : 122 (IRVMR)
तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 123 (IRVMR)
तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 124 (IRVMR)
तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 125 (IRVMR)
मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.
स्तोत्रसंहिता 119 : 126 (IRVMR)
ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 127 (IRVMR)
खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
स्तोत्रसंहिता 119 : 128 (IRVMR)
यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 129 (IRVMR)
पे तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो.
स्तोत्रसंहिता 119 : 130 (IRVMR)
तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते.
स्तोत्रसंहिता 119 : 131 (IRVMR)
मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.
स्तोत्रसंहिता 119 : 132 (IRVMR)
तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस.
स्तोत्रसंहिता 119 : 133 (IRVMR)
तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.
स्तोत्रसंहिता 119 : 134 (IRVMR)
मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 135 (IRVMR)
तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 136 (IRVMR)
त्सादे माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.
स्तोत्रसंहिता 119 : 137 (IRVMR)
हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 138 (IRVMR)
तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 139 (IRVMR)
रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 140 (IRVMR)
तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 141 (IRVMR)
मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 142 (IRVMR)
तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 143 (IRVMR)
मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 144 (IRVMR)
तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
स्तोत्रसंहिता 119 : 145 (IRVMR)
कोफ मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 146 (IRVMR)
मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 147 (IRVMR)
मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 148 (IRVMR)
तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
स्तोत्रसंहिता 119 : 149 (IRVMR)
तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव.
स्तोत्रसंहिता 119 : 150 (IRVMR)
जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 151 (IRVMR)
हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 152 (IRVMR)
तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 153 (IRVMR)
रेश माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 154 (IRVMR)
तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
स्तोत्रसंहिता 119 : 155 (IRVMR)
दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत.
स्तोत्रसंहिता 119 : 156 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे.
स्तोत्रसंहिता 119 : 157 (IRVMR)
मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 158 (IRVMR)
विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत.
स्तोत्रसंहिता 119 : 159 (IRVMR)
तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव.
स्तोत्रसंहिता 119 : 160 (IRVMR)
तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 161 (IRVMR)
शीन अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत; तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते.
स्तोत्रसंहिता 119 : 162 (IRVMR)
ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो.
स्तोत्रसंहिता 119 : 163 (IRVMR)
मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 164 (IRVMR)
मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य, निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 165 (IRVMR)
तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळण नसते.
स्तोत्रसंहिता 119 : 166 (IRVMR)
हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 167 (IRVMR)
मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 168 (IRVMR)
मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 169 (IRVMR)
ताव हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे.
स्तोत्रसंहिता 119 : 170 (IRVMR)
माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.
स्तोत्रसंहिता 119 : 171 (IRVMR)
तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.
स्तोत्रसंहिता 119 : 172 (IRVMR)
माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 173 (IRVMR)
तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 174 (IRVMR)
हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 175 (IRVMR)
माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला मदत करो.
स्तोत्रसंहिता 119 : 176 (IRVMR)
मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे; तू आपल्या सेवकाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.
❮
❯