स्तोत्रसंहिता 12 : 1 (IRVMR)
दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना *मुख्य गायकासाठी; शमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे. विश्वासू गायब झाला आहे.
स्तोत्रसंहिता 12 : 2 (IRVMR)
प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.
स्तोत्रसंहिता 12 : 3 (IRVMR)
परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.
स्तोत्रसंहिता 12 : 4 (IRVMR)
हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?”
स्तोत्रसंहिता 12 : 5 (IRVMR)
परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.”
स्तोत्रसंहिता 12 : 6 (IRVMR)
परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.
स्तोत्रसंहिता 12 : 7 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुच त्यांना * आम्हास सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना आम्हास सर्वकाळ राखशील.
स्तोत्रसंहिता 12 : 8 (IRVMR)
मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.

1 2 3 4 5 6 7 8