स्तोत्रसंहिता 120 : 1 (IRVMR)
{कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना} [PS] माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, [QBR] आणि त्याने मला उत्तर दिले. [QBR]
स्तोत्रसंहिता 120 : 2 (IRVMR)
हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, [QBR] आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव. [QBR]
स्तोत्रसंहिता 120 : 3 (IRVMR)
हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, [QBR] आणि आणखी तुला काय मिळणार? [QBR]
स्तोत्रसंहिता 120 : 4 (IRVMR)
तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, [QBR] रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील. [QBR]
स्तोत्रसंहिता 120 : 5 (IRVMR)
मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, [QBR] मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 120 : 6 (IRVMR)
शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर [QBR] मी खूप काळ राहिलो आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 120 : 7 (IRVMR)
मी शांतीप्रिय मनुष्य आहे, [QBR] पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात. [PE]

1 2 3 4 5 6 7

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: