स्तोत्रसंहिता 120 : 1 (IRVMR)
कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.
स्तोत्रसंहिता 120 : 2 (IRVMR)
हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
स्तोत्रसंहिता 120 : 3 (IRVMR)
हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?
स्तोत्रसंहिता 120 : 4 (IRVMR)
तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
स्तोत्रसंहिता 120 : 5 (IRVMR)
मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
स्तोत्रसंहिता 120 : 6 (IRVMR)
शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.
स्तोत्रसंहिता 120 : 7 (IRVMR)
मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.

1 2 3 4 5 6 7