स्तोत्रसंहिता 121 : 1 (IRVMR)
परमेश्वर तुझा रक्षक आहे मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल?
स्तोत्रसंहिता 121 : 2 (IRVMR)
परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते.
स्तोत्रसंहिता 121 : 3 (IRVMR)
तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
स्तोत्रसंहिता 121 : 4 (IRVMR)
पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.
स्तोत्रसंहिता 121 : 5 (IRVMR)
परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.
स्तोत्रसंहिता 121 : 6 (IRVMR)
दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.
स्तोत्रसंहिता 121 : 7 (IRVMR)
परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
स्तोत्रसंहिता 121 : 8 (IRVMR)
परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
❮
❯