स्तोत्रसंहिता 122 : 1 (IRVMR)
यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना दाविदाचे स्तोत्र आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते* माझे मित्र मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
स्तोत्रसंहिता 122 : 2 (IRVMR)
हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
स्तोत्रसंहिता 122 : 3 (IRVMR)
हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
स्तोत्रसंहिता 122 : 4 (IRVMR)
इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
स्तोत्रसंहिता 122 : 5 (IRVMR)
कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
स्तोत्रसंहिता 122 : 6 (IRVMR)
यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
स्तोत्रसंहिता 122 : 7 (IRVMR)
तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
स्तोत्रसंहिता 122 : 8 (IRVMR)
माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
स्तोत्रसंहिता 122 : 9 (IRVMR)
परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.
❮
❯