स्तोत्रसंहिता 124 : 1 (IRVMR)
शत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती दाविदाचे स्तोत्र आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता,
स्तोत्रसंहिता 124 : 2 (IRVMR)
जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,
स्तोत्रसंहिता 124 : 3 (IRVMR)
जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते.
स्तोत्रसंहिता 124 : 4 (IRVMR)
जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.
स्तोत्रसंहिता 124 : 5 (IRVMR)
मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
स्तोत्रसंहिता 124 : 6 (IRVMR)
परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.
स्तोत्रसंहिता 124 : 7 (IRVMR)
पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
स्तोत्रसंहिता 124 : 8 (IRVMR)
पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.
❮
❯