स्तोत्रसंहिता 125 : 1 (IRVMR)
परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.
स्तोत्रसंहिता 125 : 2 (IRVMR)
यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती आता आणि सर्वकाळ आहे.
स्तोत्रसंहिता 125 : 3 (IRVMR)
नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही. नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील.
स्तोत्रसंहिता 125 : 4 (IRVMR)
हे परमेश्वरा, जे चांगले आहेत, आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.
स्तोत्रसंहिता 125 : 5 (IRVMR)
पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात, परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. इस्राएलांवर शांती असो.

1 2 3 4 5