स्तोत्रसंहिता 126 : 1 (IRVMR)
परत आणल्याबद्दल उपकारस्तुती सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले.
स्तोत्रसंहिता 126 : 2 (IRVMR)
मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.
स्तोत्रसंहिता 126 : 3 (IRVMR)
परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; आम्ही किती हर्षित झालो आहोत!
स्तोत्रसंहिता 126 : 4 (IRVMR)
परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे आम्हास बंदिवासातून परत आण.
स्तोत्रसंहिता 126 : 5 (IRVMR)
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.
स्तोत्रसंहिता 126 : 6 (IRVMR)
जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.
❮
❯