स्तोत्रसंहिता 129 : 1 (IRVMR)
सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.
स्तोत्रसंहिता 129 : 2 (IRVMR)
त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.
स्तोत्रसंहिता 129 : 3 (IRVMR)
नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.
स्तोत्रसंहिता 129 : 4 (IRVMR)
परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
स्तोत्रसंहिता 129 : 5 (IRVMR)
जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
स्तोत्रसंहिता 129 : 6 (IRVMR)
ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.
स्तोत्रसंहिता 129 : 7 (IRVMR)
त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
स्तोत्रसंहिता 129 : 8 (IRVMR)
त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”
❮
❯