स्तोत्रसंहिता 129 : 1 (IRVMR)
{सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना} [PS] इस्राएलाने आता म्हणावे की, [QBR] माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 129 : 2 (IRVMR)
त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, [QBR] तरी ते मला पराजित करू शकले नाहीत. [QBR]
स्तोत्रसंहिता 129 : 3 (IRVMR)
नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; [QBR] त्यांनी आपली तासे लांब केली. [QBR]
स्तोत्रसंहिता 129 : 4 (IRVMR)
परमेश्वर न्यायी आहे; [QBR] त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 129 : 5 (IRVMR)
जे सियोनेचा तिरस्कार करतात, [QBR] ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 129 : 6 (IRVMR)
ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच [QBR] सुकून जाते त्यासारखे होवोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 129 : 7 (IRVMR)
त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, [QBR] किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 129 : 8 (IRVMR)
त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, [QBR] “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; [QBR] परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.” [PE]

1 2 3 4 5 6 7 8

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: