स्तोत्रसंहिता 13 : 1 (IRVMR)
{संकटकाळी साहाय्यासाठी प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? [QBR] किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे? [QBR]
स्तोत्रसंहिता 13 : 2 (IRVMR)
पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, [QBR] किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? [QBR] किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? [QBR]
स्तोत्रसंहिता 13 : 3 (IRVMR)
हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. [QBR] मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर. [QBR]
स्तोत्रसंहिता 13 : 4 (IRVMR)
मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. [QBR] म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 13 : 5 (IRVMR)
परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. [QBR] माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते. [QBR]
स्तोत्रसंहिता 13 : 6 (IRVMR)
मी परमेश्वरासाठी गाईन, [QBR] कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे. [PE]

1 2 3 4 5 6

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: