स्तोत्रसंहिता 130 : 1 (IRVMR)
परमेश्वराच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी आशा हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
स्तोत्रसंहिता 130 : 2 (IRVMR)
हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.
स्तोत्रसंहिता 130 : 3 (IRVMR)
हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
स्तोत्रसंहिता 130 : 4 (IRVMR)
पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
स्तोत्रसंहिता 130 : 5 (IRVMR)
मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
स्तोत्रसंहिता 130 : 6 (IRVMR)
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
स्तोत्रसंहिता 130 : 7 (IRVMR)
हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.
स्तोत्रसंहिता 130 : 8 (IRVMR)
तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.
❮
❯