स्तोत्रसंहिता 131 : 1 (IRVMR)
परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.
स्तोत्रसंहिता 131 : 2 (IRVMR)
खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.
स्तोत्रसंहिता 131 : 3 (IRVMR)
हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ तू परमेश्वरावर आशा ठेव.
❮
❯