स्तोत्रसंहिता 132 : 1 (IRVMR)
पवित्रस्थानाला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना हे परमेश्वरा, दावीदाकरता त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर.
स्तोत्रसंहिता 132 : 2 (IRVMR)
त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर.
स्तोत्रसंहिता 132 : 3 (IRVMR)
तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.
स्तोत्रसंहिता 132 : 4 (IRVMR)
मी आपल्या डोळ्यांवर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही.
स्तोत्रसंहिता 132 : 5 (IRVMR)
परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”
स्तोत्रसंहिता 132 : 6 (IRVMR)
पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; आम्हास तो जारच्या रानात सापडला.
स्तोत्रसंहिता 132 : 7 (IRVMR)
आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ; आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू.
स्तोत्रसंहिता 132 : 8 (IRVMR)
हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये,
स्तोत्रसंहिता 132 : 9 (IRVMR)
तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत; तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत.
स्तोत्रसंहिता 132 : 10 (IRVMR)
तुझा सेवक दावीदाकरिता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 132 : 11 (IRVMR)
परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.
स्तोत्रसंहिता 132 : 12 (IRVMR)
जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.
स्तोत्रसंहिता 132 : 13 (IRVMR)
खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.
स्तोत्रसंहिता 132 : 14 (IRVMR)
“ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे; मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे.
स्तोत्रसंहिता 132 : 15 (IRVMR)
मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन.
स्तोत्रसंहिता 132 : 16 (IRVMR)
मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन; तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील.
स्तोत्रसंहिता 132 : 17 (IRVMR)
तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.
स्तोत्रसंहिता 132 : 18 (IRVMR)
मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18