स्तोत्रसंहिता 135 : 1 (IRVMR)
परमेश्वराची थोरवी आणि मूर्तीची निरर्थकता परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, तुम्ही त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 135 : 2 (IRVMR)
परमेश्वराच्या घरात उभे राहाणाऱ्यांनो, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, तुम्ही त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 135 : 3 (IRVMR)
परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे.
स्तोत्रसंहिता 135 : 4 (IRVMR)
कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे.
स्तोत्रसंहिता 135 : 5 (IRVMR)
परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे.
स्तोत्रसंहिता 135 : 6 (IRVMR)
परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो.
स्तोत्रसंहिता 135 : 7 (IRVMR)
तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.
स्तोत्रसंहिता 135 : 8 (IRVMR)
त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले.
स्तोत्रसंहिता 135 : 9 (IRVMR)
हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले.
स्तोत्रसंहिता 135 : 10 (IRVMR)
त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला, आणि शक्तीमान राजांना मारून टाकले,
स्तोत्रसंहिता 135 : 11 (IRVMR)
अमोऱ्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला.
स्तोत्रसंहिता 135 : 12 (IRVMR)
त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला.
स्तोत्रसंहिता 135 : 13 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील.
स्तोत्रसंहिता 135 : 14 (IRVMR)
कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
स्तोत्रसंहिता 135 : 15 (IRVMR)
राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत.
स्तोत्रसंहिता 135 : 16 (IRVMR)
त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत; त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत.
स्तोत्रसंहिता 135 : 17 (IRVMR)
त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही.
स्तोत्रसंहिता 135 : 18 (IRVMR)
जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्यांच्यासारख्याच त्या आहेत.
स्तोत्रसंहिता 135 : 19 (IRVMR)
हे इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा; अहरोनाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.
स्तोत्रसंहिता 135 : 20 (IRVMR)
लेवीच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा.
स्तोत्रसंहिता 135 : 21 (IRVMR)
जो परमेश्वर यरूशलेमेत राहतो, त्याचा धन्यवाद सियोनेत होवो. परमेश्वराची स्तुती करा.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21