स्तोत्रसंहिता 136 : 1 (IRVMR)
परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 2 (IRVMR)
देवांच्या देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 3 (IRVMR)
प्रभूंच्या प्रभूंची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 4 (IRVMR)
जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 5 (IRVMR)
ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची, उपकारस्तुती करा, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 6 (IRVMR)
ज्याने जलावर पृथ्वी पसरवली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 7 (IRVMR)
ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 8 (IRVMR)
दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्याची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 9 (IRVMR)
त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 10 (IRVMR)
त्याने मिसराचे पहिले जन्मलेले मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 11 (IRVMR)
आणि ज्याने इस्राएलाला त्यांच्यामधून बाहेर काढले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 12 (IRVMR)
ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 13 (IRVMR)
ज्याने लाल समुद्र दुभागला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 14 (IRVMR)
ज्याने इस्राएलाला त्यामधून पार नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 15 (IRVMR)
ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 16 (IRVMR)
ज्याने आपल्या लोकांस रानातून नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 17 (IRVMR)
ज्याने महान राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 18 (IRVMR)
आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 19 (IRVMR)
ज्याने अमोऱ्यांच्या सीहोन राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 20 (IRVMR)
आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 21 (IRVMR)
आणि ज्याने त्यांचा देश वतन असा दिला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 22 (IRVMR)
ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 23 (IRVMR)
ज्याने आमच्या कठीन परिस्थितीत आमची आठवण केली आणि आम्हास मदत केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 24 (IRVMR)
ज्याने आम्हास आमच्या शत्रूंवर विजय दिला त्याची, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 25 (IRVMR)
जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136 : 26 (IRVMR)
स्वर्गातील देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
❮
❯