स्तोत्रसंहिता 137 : 1 (IRVMR)
{बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत} [PS] आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; [QBR] आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो. [QBR]
स्तोत्रसंहिता 137 : 2 (IRVMR)
तेथील वाळुंजावर [QBR] आम्ही आमच्या वीणा टांगल्या. [QBR]
स्तोत्रसंहिता 137 : 3 (IRVMR)
तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले [QBR] आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, [QBR] सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. [QBR]
स्तोत्रसंहिता 137 : 4 (IRVMR)
परक्या देशात [QBR] आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे? [QBR]
स्तोत्रसंहिता 137 : 5 (IRVMR)
हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, [QBR] तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. [QBR]
स्तोत्रसंहिता 137 : 6 (IRVMR)
जर मी तुला विसरलो, [QBR] जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य [QBR] विषयाहून अधिक मानले नाही [QBR] तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. [QBR]
स्तोत्रसंहिता 137 : 7 (IRVMR)
हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या [QBR] त्या दिवसाची आठवण कर, [QBR] ते म्हणाले, ती पाडून टाका, [QBR] पायापर्यंत पाडून टाका. [QBR]
स्तोत्रसंहिता 137 : 8 (IRVMR)
हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, [QBR] कारण जसे तू आम्हास केले तसे, [QBR] जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 137 : 9 (IRVMR)
जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो [QBR] तो आशीर्वादित होईल. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: