स्तोत्रसंहिता 137 : 1 (IRVMR)
बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.
स्तोत्रसंहिता 137 : 2 (IRVMR)
तेथील वाळुंजावर आम्ही आमच्या वीणा टांगल्या.
स्तोत्रसंहिता 137 : 3 (IRVMR)
तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.
स्तोत्रसंहिता 137 : 4 (IRVMR)
परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
स्तोत्रसंहिता 137 : 5 (IRVMR)
हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
स्तोत्रसंहिता 137 : 6 (IRVMR)
जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
स्तोत्रसंहिता 137 : 7 (IRVMR)
हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या त्या दिवसाची आठवण कर, ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत पाडून टाका.
स्तोत्रसंहिता 137 : 8 (IRVMR)
हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.
स्तोत्रसंहिता 137 : 9 (IRVMR)
जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो तो आशीर्वादित होईल.

1 2 3 4 5 6 7 8 9