स्तोत्रसंहिता 14 : 1 (IRVMR)
मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई
स्तोत्र. 53:1-6
*मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही.
स्तोत्रसंहिता 14 : 2 (IRVMR)
परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय?
स्तोत्रसंहिता 14 : 3 (IRVMR)
प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.
स्तोत्रसंहिता 14 : 4 (IRVMR)
जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?
स्तोत्रसंहिता 14 : 5 (IRVMR)
परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे.
स्तोत्रसंहिता 14 : 6 (IRVMR)
तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे.
स्तोत्रसंहिता 14 : 7 (IRVMR)
अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.

1 2 3 4 5 6 7