स्तोत्रसंहिता 141 : 1 (IRVMR)
{वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. [QBR] जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक. [QBR]
स्तोत्रसंहिता 141 : 2 (IRVMR)
माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, [QBR] ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो. [QBR]
स्तोत्रसंहिता 141 : 3 (IRVMR)
हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; [QBR] माझ्या ओठांचे द्वार सांभाळ. [QBR]
स्तोत्रसंहिता 141 : 4 (IRVMR)
अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या [QBR] पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, [QBR] जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 141 : 5 (IRVMR)
नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. [QBR] तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. [QBR] माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही. [QBR] परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 141 : 6 (IRVMR)
त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; [QBR] ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 141 : 7 (IRVMR)
जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, [QBR] तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 141 : 8 (IRVMR)
तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; [QBR] मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 141 : 9 (IRVMR)
त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व [QBR] दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर. [QBR]
स्तोत्रसंहिता 141 : 10 (IRVMR)
दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत, [QBR] मी त्यातून निसटून जाईन. [PE]
❮
❯