स्तोत्रसंहिता 144 : 1 (IRVMR)
सुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थना दाविदाचे स्तोत्र परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो, जो माझ्या हाताला युद्ध करण्यास; आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो.
स्तोत्रसंहिता 144 : 2 (IRVMR)
तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो.
स्तोत्रसंहिता 144 : 3 (IRVMR)
हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा?
स्तोत्रसंहिता 144 : 4 (IRVMR)
मनुष्य एका श्वासासारखा आहे; त्याचे दिवस नाहीशा होणाऱ्या सावलीसारखे आहेत.
स्तोत्रसंहिता 144 : 5 (IRVMR)
हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे.
स्तोत्रसंहिता 144 : 6 (IRVMR)
विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक; तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.
स्तोत्रसंहिता 144 : 7 (IRVMR)
वरून आपले हात लांब कर; महापुरातून, या परक्यांच्या हातून, मला सोडवून वाचव.
स्तोत्रसंहिता 144 : 8 (IRVMR)
त्यांचे मुख असत्य बोलते, आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
स्तोत्रसंहिता 144 : 9 (IRVMR)
हे देवा, मी तुला नवे गाणे गाईन. दशतंतु वीणेवर मी तुझी स्तवने गाईन;
स्तोत्रसंहिता 144 : 10 (IRVMR)
तूच राजांना तारण देणारा आहे; तूच आपला सेवक दावीद याला दुष्टाच्या तलवारीपासून वाचवले.
स्तोत्रसंहिता 144 : 11 (IRVMR)
मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव. त्यांचे मुख असत्य बोलते; आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
स्तोत्रसंहिता 144 : 12 (IRVMR)
आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत. आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत.
स्तोत्रसंहिता 144 : 13 (IRVMR)
आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत. आणि आमच्या शेतात आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत.
स्तोत्रसंहिता 144 : 14 (IRVMR)
मग आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यात नसावेत;
स्तोत्रसंहिता 144 : 15 (IRVMR)
ज्यांना असे आशीर्वाद आहेत ते लोक आशीर्वादित आहेत; ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते आनंदी आहेत.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15