स्तोत्रसंहिता 145 : 1 (IRVMR)
परमेश्वराचे चांगुलपण व सामर्थ्य ह्यांबद्दल स्तुती दाविदाचे स्तोत्र माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.
स्तोत्रसंहिता 145 : 2 (IRVMR)
प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन.
स्तोत्रसंहिता 145 : 3 (IRVMR)
परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे.
स्तोत्रसंहिता 145 : 4 (IRVMR)
एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.
स्तोत्रसंहिता 145 : 5 (IRVMR)
ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन.
स्तोत्रसंहिता 145 : 6 (IRVMR)
ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.
स्तोत्रसंहिता 145 : 7 (IRVMR)
ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.
स्तोत्रसंहिता 145 : 8 (IRVMR)
परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.
स्तोत्रसंहिता 145 : 9 (IRVMR)
परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
स्तोत्रसंहिता 145 : 10 (IRVMR)
हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.
स्तोत्रसंहिता 145 : 11 (IRVMR)
ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील.
स्तोत्रसंहिता 145 : 12 (IRVMR)
हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी.
स्तोत्रसंहिता 145 : 13 (IRVMR)
तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.
स्तोत्रसंहिता 145 : 14 (IRVMR)
पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो.
स्तोत्रसंहिता 145 : 15 (IRVMR)
सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
स्तोत्रसंहिता 145 : 16 (IRVMR)
तू आपला हात उघडून प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.
स्तोत्रसंहिता 145 : 17 (IRVMR)
परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.
स्तोत्रसंहिता 145 : 18 (IRVMR)
जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.
स्तोत्रसंहिता 145 : 19 (IRVMR)
तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो.
स्तोत्रसंहिता 145 : 20 (IRVMR)
परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो.
स्तोत्रसंहिता 145 : 21 (IRVMR)
माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21