स्तोत्रसंहिता 147 : 1 (IRVMR)
यरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे.
स्तोत्रसंहिता 147 : 2 (IRVMR)
परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो.
स्तोत्रसंहिता 147 : 3 (IRVMR)
तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
स्तोत्रसंहिता 147 : 4 (IRVMR)
तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.
स्तोत्रसंहिता 147 : 5 (IRVMR)
आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही.
स्तोत्रसंहिता 147 : 6 (IRVMR)
परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.
स्तोत्रसंहिता 147 : 7 (IRVMR)
गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा.
स्तोत्रसंहिता 147 : 8 (IRVMR)
तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो.
स्तोत्रसंहिता 147 : 9 (IRVMR)
तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.
स्तोत्रसंहिता 147 : 10 (IRVMR)
घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही.
स्तोत्रसंहिता 147 : 11 (IRVMR)
जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.
स्तोत्रसंहिता 147 : 12 (IRVMR)
हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर.
स्तोत्रसंहिता 147 : 13 (IRVMR)
कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत.
स्तोत्रसंहिता 147 : 14 (IRVMR)
तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.
स्तोत्रसंहिता 147 : 15 (IRVMR)
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
स्तोत्रसंहिता 147 : 16 (IRVMR)
तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो.
स्तोत्रसंहिता 147 : 17 (IRVMR)
तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
स्तोत्रसंहिता 147 : 18 (IRVMR)
तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.
स्तोत्रसंहिता 147 : 19 (IRVMR)
त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले.
स्तोत्रसंहिता 147 : 20 (IRVMR)
त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20