स्तोत्रसंहिता 147 : 1 (IRVMR)
{यरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती} [PS] परमेश्वराची स्तुती करा, [QBR] कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; [QBR] ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 2 (IRVMR)
परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; [QBR] तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 3 (IRVMR)
तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, [QBR] आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 4 (IRVMR)
तो ताऱ्यांची मोजणी करतो; [QBR] तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 5 (IRVMR)
आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; [QBR] त्याची बुद्धी मोजू शकत नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 6 (IRVMR)
परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; [QBR] तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 7 (IRVMR)
गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. [QBR] वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 8 (IRVMR)
तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, [QBR] आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, [QBR] तो डोंगरावर गवत उगवतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 9 (IRVMR)
तो प्राण्यांना [QBR] आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 10 (IRVMR)
घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; [QBR] मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 11 (IRVMR)
जे परमेश्वराचा आदर करतात, [QBR] जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 12 (IRVMR)
हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; [QBR] हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 13 (IRVMR)
कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; [QBR] त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 14 (IRVMR)
तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; [QBR] तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 15 (IRVMR)
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; [QBR] त्याचा शब्द फार वेगाने धावतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 16 (IRVMR)
तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; [QBR] तो राखेसारखे दवाचे कण विखरतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 17 (IRVMR)
तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; [QBR] त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 18 (IRVMR)
तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; [QBR] तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 19 (IRVMR)
त्याने याकोबाला आपले वचन, [QBR] इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले. [QBR]
स्तोत्रसंहिता 147 : 20 (IRVMR)
त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; [QBR] आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: