स्तोत्रसंहिता 149 : 1 (IRVMR)
इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
स्तोत्रसंहिता 149 : 2 (IRVMR)
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
स्तोत्रसंहिता 149 : 3 (IRVMR)
ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
स्तोत्रसंहिता 149 : 4 (IRVMR)
कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.
स्तोत्रसंहिता 149 : 5 (IRVMR)
भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
स्तोत्रसंहिता 149 : 6 (IRVMR)
देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
स्तोत्रसंहिता 149 : 7 (IRVMR)
यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी.
स्तोत्रसंहिता 149 : 8 (IRVMR)
ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
स्तोत्रसंहिता 149 : 9 (IRVMR)
ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा.
❮
❯